…अन्यथा २१ ऑक्टोबरला मनसे आक्रमक पवित्रा घेणा

जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यासाठी मनसे आग्रही व गुहागर सा.बां. उपविभागाला निवेदन 

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी–जानवळे फाटामार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांनाही हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे काही दिवसांपूर्वी बस उलटण्याची घटना घडली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र याबाबीची गंभीर दखल घेऊन गुहागर सार्वजनिक बांधकाम उपविभागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. अद्यापही या रस्त्याची दुरवस्था कायम असून, या मागणीची गांभीर्याने दखल घेतली तर २१ ऑक्टोबरला मनसे आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे जानवळकर यांनी स्पष्ट केले आहे. 

या संदर्भात नुकत्याच गुहागर सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात आली नाही, तर मनसेच्या वतीने जानवळे रस्त्यावर ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. याशिवाय, रस्त्यावरील दुर्लक्षामुळे अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांच्यावर राहील. रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती व दर्जेदार दुरुस्ती करून जनतेला दिलासा ही आपली कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. या पत्रास अनुसरून २० ऑक्टोबरपर्यंत आपण योग्य ती आवश्यक कार्यवाही करून रस्ता दुरुस्त न केल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल आणि जानवळे गावातील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अतिरिक्त असलेल्या रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल पुढील होणाऱ्या परिणामास सर्वस्व जबाबदार आपणच जबाबदार राहाल याचीही नोंद घ्यावी, असा इशारा या निवेदनात दिला आहे. 

या निवेदनाची प्रत अधीक्षक धिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी, तसेच कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चिपळूण यांना देण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button