अपघातात जखमी झालेल्या नाचणे येथील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
नाचणे येथील अपघातात जखमी झालेला हर्षल राजेंद्र ढेपसे (२६, रा. नाचणे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हर्षल याच्यावर मागील तीन महिन्यांपासून कोल्हापूर येथे उपचार करण्यात येत होते. नुकतेच त्याला गावी आणण्यात आले असता अचानक त्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड होवून पुन्हा कोल्हापूर येथे नेत असताना मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार हर्षल याचा तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या हर्षल याला तातडीने कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतेच त्याला कोल्हापूर येथील रूग्णालयातून घरी आणण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी पुन्हा कोल्हापूर येथे नेण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथे नेत असताना हर्षल याचा मृत्यू झाला. हर्षल याच्या निधनाने श्री साई सेवा मित्रमंडळ, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.www.konkantoday.com