चिपळुणात लोखंडी साहित्य चोरणार्या दोन महिलांना अटक
बांधकाम व्यवसायासाठी लागणारे ९ हजाराचे लोखंडी साहित्य चोरीस गेल्याची घटना २ ते ४ मार्च या कालावधीत उक्ताड परिसरात नासीर खोत यांचया बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्यालयाशेजारी घडली होती.पोलिसांच्या तपासाअंती दोन महिलांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.विमल अरूण जुवे (३०, रा. उक्ताड), वर्षा विनोद गोसावी (३०, खेंड) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. www.konkantoday.com