
शिरळ येेथे जयभीम स्तंभ तोडणारा वाहनधारक सापडला
काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील शिरळ येथे वाहनाच्या धडकेने जयभीम स्तंभ तुटला होता. त्या वाहनधारकाचा शोध लागला असून त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर तुटलेल्या स्तंभाची नव्याने बांधणी सुरू करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी हा स्तंभ पहाटेच्यावेळी तुटलेला दिसून आला. त्यामुळे याची माहिती शिरळ पंचक्रोशीत पसरताच भीमसैनिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. त्यानंतर तत्काळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.यावेळी उपस्थित भीमसैनिकांनी संबंधिताला तत्काळ अटक करा, अशी मागणी लावून धरली होती. तर हितसंरक्षण समिती शिरळ शाखेचे सल्लागार प्रविण जाधव यांनी याची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.त्यानंतर पोलीस व भीमसैनिक परिसरातील ससीटीव्ही व अन्य माध्यमातून वाहनाचा शोध घेत होते. त्यानुसार वाहनाचा शोध लागला. त्यामुळे पोलिसांनी संबंधित चालकाचा जबाब घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. www.konkantoday.com