
मुलीला मारहाण करून महिलेचे पैसे हिसकावले
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे मुलाला मारहाण करून महिलेच्या हातातील २० हजार रुपये हिसकावल्याचा प्रकार समोर आला आहे. नाजनीन मोहमद हनिफ सोलकर (३५, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) असे महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दोन महिलांविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाजनीन या आपल्या घरामध्ये पैसे मोजत होत्या. यावेळी दोन महिला त्यांच्या मुलाला मारहाण करत त्यांच्या घरामध्ये घुसल्या. यावेळी नाजनीन यांच्या मुलाला मारहाण करत त्यांच्या हातातील २० हजार रुपये हिसकावून घेवून गेल्या, अशी तक्रार नाजनीन यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलेविरूद्ध भादंवि कलम ३७९, ४५२, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com