दोन शाळकरी मुलींच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
चिपळूण तालुक्यातील कादवड कातकरवाडीतील नववी इयत्तेत शिक्षण घेणार्या दोन शाळकरी मुली शनिवारी कपडे धुण्यासाठी गेल्या असताना तिवरे नदीच्या पंदळी पात्रात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृत्यूचे कारण अद्याप पुढे आलेले नसले तरी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर ते स्पष्ट होणार आहे. शनिवारी रात्री उशिरा या दोघींवर कादवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मधुरा लवेल जाधव (१६, पोसरे-खेड), सोनाली राजेंद्र निकम (१६, कादवड) अशी मृत्यू झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत. मधुरा व सोनाली या दोघी शनिवारी दुपारी ११.३० च्या सुमारास कातकरवाडीपासून काही अंतरावर असलेल्या तिवरे नदीच्या पंदळी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. असे असताना बराच वेळ झाला तरी त्या घरी न परतल्याने यावेळी त्यांचे पालक या नदीपात्रात गेले असताना त्या दोघी बेशुद्ध स्थितीत आढळल्या होत्या.www.konkantoday.com