
कोकण मार्गावर मडगावहून मुंबईच्या दिशेने धावणार्या मांडवी एक्स्प्रेसवर दगडफेक
कोकण मार्गावर मडगावहून मुंबईच्या दिशेने धावणार्या मांडवी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी एका डब्यातील खिडकीची काच फुटली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पाहणी केली. अज्ञाताचा कसून शोध सुरू असल्याचे समजते.कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश मिळवताना प्रवाशांची दमछाक होत असताना त्यात विलंबाच्या प्रवासाची भर पडत आहे. दरम्यान १०१०४ क्रमांकाच्या मडगांव-सीएसएमटी मुुंबई मांडवी एक्स्प्रेस अज्ञाताने दगडफेक केल्याने एकच खळबळ उडाली.या एक्स्प्रेसच्या ए वन-२९ डब्याच्या खिडकीवर झालेल्या दगडफेकीत कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. मात्र खिडकीची काच फुटल्याचे समोर आले आहे.www.konkantoday.com