मुंबई तापणार…..हवामान विभागाचा इशारा
थंडीचा आनंद लुटल्यानंतर मुंबईकरांना आता उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.येत्या आठवडाभरात मुंबई आणि आजूबाजूच्या भागात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझमध्ये येत्या गुरुवारपर्यंत तापमान ३७-३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर, शहरातील काही भागात तापमान ४१- ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.www.konkantoday.com