
इतर मागास बहुजन कल्याण विभाग जिल्ह्यामध्ये 20 ते 29 ऑगस्ट मेळावे
रत्नागिरी, : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये 20 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हॉल, कुवारबाव येथे सकाळी 10 वाजता, राजापूर येथे 21 ऑगस्ट रोजी आबासाहेब मराठे महाविद्यालय, राजापूर सकाळी 10 वाजता, लांजा येथे 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. टि.पी. शेट्ये महाविद्यालय, संगमेश्वर तालुक्यामध्ये 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देवरुख येथे, चिपळूण तालुक्यात 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. डी.बी.जे कॉलेज येथे, गुहागर तालुक्यात 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. न्यू इंग्लिश स्कुल व ज्य. कॉलेज पाटपन्हाळे येथे, दापोली तालुक्यात 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ए.जे. हायस्कूल, खेड तालुक्यात 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. बीएड कॉलेज भरणे येथे तर मंडणगड तालुक्यामध्ये 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मंडणगड येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.