आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलरचा वापर न करण्याचा सिंधुदुर्ग गोभी मंच्युरियन विक्रेते संघाचा निर्णय
_सिंधुदुर्ग जिल्हा गोभी मंच्युरियन विक्रेते संघटनेची बैठक रविवारी कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलर वापर करणार नसल्याचं निर्णय सिंधुपुत्र मंच्युरियन विक्रेते संघटनांनी घेतला आहे.नवनियुक्त अध्यक्ष वैभव घोगळे यांनी याबाबत माहिती दिली.सद्यस्थितीत गोभी मंच्युरियन मागणी वाढलेली असून त्याचा आबालवृद्ध आस्वाद घेत असतात. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलर वापर करणार नसल्याचं निर्णय एकमताने मंजूर करून त्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असल्याचा निर्णय अध्यक्ष वैभव घोगळे यांनी जाहीर केला.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गोभी मंच्युरियन विक्रेते यांनी आपल्या व्यवसायाची नोंदणी करून संघटनेने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच फूड कलर वापर न करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करण्यात आली आहे. www.konkantoday.com