
खाजगी रूग्णालयांनी नाटके करू नयेत, शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सावंत यांचा इशारा
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध दाेन खाजगी रूग्णालयानी देवरूख तुळसणी येथील एका रूग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. दोन्ही रूग्णालयांनी एकमेकांकडे रूग्णाला पाठविले. मात्र प्रत्यक्षात रूग्णाला कोणीच दाखल करून घेतले नाही. शेवटी या रूग्णाला मजगांव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करावे लागले होते. रूग्णाची कोणतीही तपासणी न करताच त्याला दाखल न केल्याने खाजगी रूग्णालयांबाबत नाराजी व्यक्त झाली होती.याबाबत आता शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सावंत यांनी खाजगी रूग्णालयांना इशारा दिला असून रूग्णालयाने अशी नाटके करू नयेत असे सांगितले आहे. सध्याच्या परिस्थितीत आशेचा किरण म्हणून लोक खाजगी रूग्णालयाकडे येत असतात. अशावेळी रूग्णांना रूग्णालयाने अशी वागणूक दिल्यास यापुढे आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
www.konkantoday.com