महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ जास्तीत-जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा

रत्नागिरी, दि. 15 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राज्यातील १८ ते ६० वयोगटातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करण्याकरिता राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना व राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ जास्तीत-जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या यांनी केले आहे.* महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावरील डाऊनलोडमध्ये कर्ज योजनांचे अर्ज व महामंडळाचे माहितीपत्रक https://mshfdc.co.in/index.php/२०१३-०४-१२-१३-२०-५६ या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button