आशा स्वयंसेविकांना उत्कृष्ट कामाबाबत पुरस्कार वितरण प्रथम मेघा नेवरेकर, वैशाली कुडेकर व्दितीय तर, सुमित्रा साळवी तृतीय

रत्नागिरी, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबाबत पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषदेच्या हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये झाला.* या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे, जिल्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, ग्रामीण पाणी पुरवठाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील उपस्थित होते. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चिपळूण येथील मेघा महेश नेवरेकर – रुपये 25 हजार, प्राथमिक आरोग्य केंद्र केळशी ,दापोलीच्या वैशाली विश्वनाथ कुडेकर व्दितीय क्रमांक – रुपये 15 हजार व प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे, खेड च्या सुमित्रा सुरेश साळवी, यांना तृतीय क्रमांक रुपये – 5 हजार प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून सन्मानित करण्यात आले. आरोग्य विषयक कार्यक्रमांची माहिती समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा शेवटच्या स्तरापर्यंत मिळवून देण्याकरिता आशा स्वयंसेविका काम करत आहेत. आशा स्वयंसेविका यांना एकूण 56 कामांवर आधारित मोबदला अदा करण्यात येतो. आशा स्वयंसेविका समाजात सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी व त्यांना पुन्हा अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्याकरिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिल्हास्तरावर देण्यात येतो.0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button