भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश. कोरोना काळात काम केलेल्या एन आर एच एम आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घेण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची घोषणा
कोरोना काळात काम केलेल्या एन आर एच एम आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी घेणार असल्याची घोषणा काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रत्नागिरी येथून केली. 2 डिसेंबर २०२३ रोजी एन आर एच एम डिपार्टमेंटचे नर्सेस व सहाय्यक जिल्हा परिषद येथे आपल्या मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते. त्यांच्या मागण्या होत्या की करोना काळात काम केल्यामुळे प्रशासनाने आम्हाला कायमस्वरूपी करावे ही गोष्ट भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून राजेशजी सावंत यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या त्यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब येत आहेत त्यांच्याशी तुमची भेट घालून देतो ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी त्या शिष्टमंडळाची भेट सन्माननीय चव्हाण साहेब यांच्याशी भेट करून दिली होती. चव्हाण साहेबांनी त्यांना शब्द दिला की मी हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचवतो त्याचेच फलित काल झालेल्या पोलीस ग्राउंड मध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सर्व करोना काळामध्ये काम केलेल्या सर्व आंदोलन केलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचे मंत्रिमंडळामध्ये ठराव केला व त्याची घोषणा काल रत्नागिरीमध्ये केली. मी व माझ्या सहकार्यानी केलेल्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाने प्रतिसाद देऊन योग्य निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभारी आहोत असे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केले आहे.www.konkantoday.com