
कमी भारमानामुळे एसटीच्या पाचशे फेऱ्या बंद
कमी भारमानामुळे एसटीच्या पाचशे फेऱ्या बंद,असूनत् यामध्ये खराब रस्त्यामुळे बंद असलेल्या २८ फेऱ्यांचा यात समावेश आहे
रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असून काही भागातून अत्यल्प भारमान लाभत असल्याने पाचशे फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. चिपळुणातील काही फेऱ्या बंद आहेत.
www.konkantoday.com