
कर्णेश्वर मंदिरातील शिवलिंगावर सोनेरी किरणांनी अभिषेक
संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ऐतिहासिक गावात असणाऱ्या चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिरातील शिवलिंगावर शुक्रवारी सकाळी सोनेरी किरणांनी अभिषेक केला. या वेळी मंदिरात आलेले शिवभक्त किरणांचा हा सोनेरी अभिषेक पाहून कृतकृत्य झाले आणि नतमस्तकही झाले.पूर्वीची मंदिरे उभारताना स्थापत्यशास्त्राचा अभ्यास किती प्रगत होता याची अनुभूती या प्रसंगातून येत असल्याच्या प्रतिक्रिया येथे उपस्थितांनी व्यक्त केल्या. कसबा येथील कर्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असल्याने काही ठराविक कालावधीत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सूर्य आल्यानंतर शिवलिंगावर असा किरणांचा सोनेरी अभिषेक होतो. हे मंदिर अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेwww.konkantoday.com