स्वीकृत कामाशी ते एकरूप झालेले मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या कार्याचा गौरव
चिपळून नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचे आणि माझी यापूर्वी साधी ओळखही नव्हती. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू झाले आणि ते मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याचे कळले आणि मी त्यांच्या सत्कार सोहोळ्याला येण्याची कबुली चतुरंगला दिली. सर्वांची मनोगते ऐकल्यानंतर तीस महिने या माणसाने काय काम केले असेल, याची कल्पना मला आली आहे. यामुळेच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी कला, क्रीडा अशा क्षेत्राला चालना देण्याबरोबरच महापुरातून चिपळूणला सावरताना कचरा व्यवस्थापन, अशा विविध क्षेत्रात केलेल्या कामाचा मला अभिमान वाटतोय, अशी भावना अभिनेते सुनिल बर्वे यांनी व्यक्त केली. बदली होवून गेलेल्या मुख्याधिकारी श्री. शिंगटे यांचा चतुरंगसारखी संस्था व नागरिक पुन्हा येथे गौरव करतात, हेच त्यांच्या यशाचे श्रेय आहे. माजी मुख्याधिकार्यांचे कौतुक पहायला विद्यमान मुख्याधिकारी विशाल भोसले आले, याचेही समाधान वाटतं, असेही सुनिल बर्वे म्हणाले.चिपळूण नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री. शिंगटे यांना बढती मिळून वसई-विरार महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. www.konkantoday.com