संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिरात आजपासून किरणोत्सव
पूर्वाभिमुख असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिरात वर्षातून दोन वेळा सुर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट शंकराच्या पिंडीवर येतात, किरणोत्सवाचा हा नयनरम्य देखावा पाहता येणे ही भाविकांसाठी, अभ्यासकांसाठी पर्वणी असते. आज दि. १४ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून सुमारे १०-१२ मिनिटे हा नयनरम्य सोहोळा पाहता येणार आहे. याची देही याची डोळा हा अनुपमेय सोहोळा पाहण्यासाठी येथे आजपासून पुढील तीन दिवस सकाळी ६.५५ वाजता भाविकांना किरणोत्सव पाहता येणार आहे.www.konkantoday.com