मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटेनजिक दुचाकी अपघातात दोघे जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटे येथील क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ झालेल्या दुचाकी अपघातात दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीस्वारावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभम भरत माने (रा. पिलोटे), सौरभ सुभाष झगडे (२३, रा. चिवेलीफाटा-गुहागर) अशी जखमींची नावे आहेत. सौरभ सुभाष झगडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विक्रम आनंदा मोहिते यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यातील जखमी शुभम माने हा पिरलोटे येथे क्षणभर विश्रांती हॉटेलपर्यंत पायी नाईट वॉक करत असताना एमआयडीसी अंतर्गत डांबरी रस्त्याने येणार्या दुचाकीस्वाराने धडक देवून अपघात केला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com