
जिल्ह्यातील नवनियुक्त १ हजार १४ शिक्षणसेवकांना आचारसंहितेपूर्वी नियुक्ती देण्याची मागणी
जिल्ह्यातील नवनियुक्त १ हजार १४ शिक्षणसेवकांना आचारसंहितेपूर्वी नियुक्ती द्यावी, अशी मागणी शिक्षक नेते व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे.याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकार्यांकडे निवेदन दिले आहे. पवित्र पोर्टल २०२२ भरती अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी या आस्थापनांमध्ये १ हजार १४ शिक्षकांची निवड झाली असून त्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी दि. २९ फेब्रुवारी व १ मार्च रोजी पूर्ण झाली आहे.www.konkantoday.com