कोकण मार्गावरून धावणार्या सावंतवाडी-दिवा सह रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत चालवण्याची मागणी
कोकण मार्गावरून धावणार्या सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेससह रत्नागिरी-दिवा पॅसेंजरची सेवा दादर किंवा सीएसएमटी स्थानकापर्यंत चालवण्याबाबत सातत्याने पत्रव्यवहार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही गाड्यांच्या सेवा दादर किंवा सीएसएमटी स्थानकापर्यंत चालवण्यासाठी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयंत दरेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व रेल्वेच्या अधिकार्यांना निवेदन दिले आहे.या दोन्ही गाड्यांच्या सेवांचा विस्तार करण्याबाबत अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनासह कोकणातील लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून देखील अद्याप प्रतिसादच देण्यात आलेला नाही. दिवा जंक्शन येथे मूळ गाड्या हाताळण्यासाठी सुविधांचा अभाव आहे. पाणी, साफसफाई देखभाल सुविधा आदी असुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी दोन्ही गाड्यांचा विस्तार दादर अथवा सीएसएमटी स्थानकादरम्यान करण्याबाबत कोकण विकास समितीकडून पत्रव्यवहार करून देखील उचित कार्यवाही झालेली नाही.www.konkantoday.com