
उक्षी वांद्री भागात जिओ नेटवर्क ची सुविधा तात्काळ सुरळीत करा अन्यथा आंदोलन करणार गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांचा इशारा
रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी वांद्री भागात गेल्या अनेक दिवसांपासून जिओ नेटवर्कची समस्या उद्भवत आहे.सारखे सारखे नेटवर्क येत जात आहे.त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा संबंधित कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.2-2 ते 3-3 दिवस नेटवर्क जात असल्याने महत्वाची कामे खोंबळतात.उद्भवणारी समस्या आणि होणारा त्रास लक्षात घेता गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांनी जिओ सेंटर येथे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले.व अधिकाऱ्यांशी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली.आणि इथल्या ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली. व त्याच बरोबर जर जिओची सर्व्हिस सुरळीत केली नाही तर आम्हाला कंपनीविरोधात आंदोलन करावे लागेल असा कडक इशारा ही दिला.www.konkantoday.com