विविध चोरीच्या गुन्ह्यांमधील एकजण खेड येथून ताब्यात,


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी


रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार हे खेड शहरातील नवानगर लवेल येथे २८ मे रोजी गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यामधील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सचिन रामसहजीवन चव्हाण (वय २१, रा. आजगणी नवानगर लवेल, ता. खेड जि. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.

जिल्ह्यामध्ये चोटीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार हे खेड शहरातील नवानगर लवेल येथे २८ मे रोजी गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन रामसहजीवन चव्हाण हा मौजे लवेल खेड येथे संशयितरित्या आढळून आला.
सचिन चव्हाण याची अधिक माहिती घेतली असता तो खेड पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 111/2025 भा. न्या.सं. कलम 331 (4), 305, 3 (5) तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 118/2025 भा.न्या.सं.क 331(4), 305, 3 (5) या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या गुन्हेगाराला पुढील कारवाईसाठी खेड पोलिस ठाण्यात हजर करण्यात येत आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस ठाणे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. वाघ, पो.हवा बाळू पालकर, पो.हवा गणेश सावंत, पो.हवा सत्यजित दरेकर, पो.हवा विक्रम पाटील, पो.हवा रमिज शेख, चा.पो.शी- अनिकेत नलावडे यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button