सिडको अधिसूचनेला मविआचा विरोध
कोकण किनारपट्टीवरील सुमारे १ हजार ६३५ गावे विकासासाठी सिडकोला देण्यासर्ंभातील अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. या अधिसूचनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीने तीव्र विरोध केला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांसह, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अधिसूचना फाडून आंदोलन केले.यावेळी महाविकास आघाडीतर्फे राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारने ४ मार्च रोजी सिडकोच्या काढलेल्या अधिसूचनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार संपुष्टात येवून येथे सिडको राज्य करणार आहे. स्थानिकांना किरकोळ परवानग्या घेण्यासाठी ग्रामपंचायतींऐवजी सिडकोच्या कार्यालयात जावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचे महाविकास आघाडीतर्फे सांगण्यात आले.www.konkantoday.com