
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस उद्या रत्नागिरीत
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस उद्या रत्नागिरीत येत आहेत ते रत्नागिरी शहरातील विविध विकास कामाच्या भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहेराज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस उद्या दुपारी१.३०वा. रत्नागिरी विमानतळ येथे येतील त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन शासकीय पातळीवर करण्यात आले आहे. या निमित्ताने रत्नागिरीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यांना निमंत्रीत केले होते यावेळी शहरातील पोलिस कर्मचार्यांच्या वसाहत इमारतीचे ते भूमीपूजन करणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशस्त ९ मजली इमारतीचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३.०० वा. ते पुन्हा विमानाने मुंबईला परततील.www.konkantoday.com