मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांना रहावे लागत आहे कडाक्याच्या उन्हात, सुविधा उपलब्ध करण्याची माजी सभापती शौकत मुकादम यांची मागणी
चिपळूणमध्ये अनेक प्रवासी एसटी बसमधून प्रवास करतात. या प्रवाशांना मुंबई-गोवा महामार्गावर उभे राहण्यासाठी कुठे सावली मिळेल का, असा संतापजनक सवाल माजी सभापती शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम, फरशी तिठा, रेल्वेतून येणार्या प्रवाशांसाठी वालोपे रेल्वे स्टेशनपुढे हायवेलगत, तसेच कळंबस्ते नाका, बहाद्दूरशेख नाका, पॉवर हाऊस, पाग नाका, एरिगेशन कॉलनी, कापसाळ, कामथे, कॉटेज हॉस्पिटल, कोंडमाळा, सावर्डे, डेरवण फाटा, असे चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी एसटीचे स्टॉप आहेत. तेथे पिकअपशेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे रहावे लागत आहे. मुंबई-गोवा हायवेमुळे रस्त्यालगत असलेले वटवृक्ष व इतर जंगली झाडेही तोडण्यात आली. यामुळे झाडांची असलेली सावली गेली. विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व प्रवाशांना सध्या कडाक्याच्या उन्हात उभे रहावे लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. ५ मार्च रोजी बहादूरशेख नाका येथे एसटी बसची वाट पाहत असता एका महिला भगिनीला चक्कर आली. व ती भगिनी तिच्या दोन वर्षाच्या मुलाला घेवून उभी होती. www.konkantoday.com