
रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे दिवाळीनिमित्त प्रदर्शन व विक्रीचे आयोजन.
रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे दिवाळीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे येत्या २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. टीआरपी येथील अंबर हॉल येथे हे प्रदर्शन भरवले जाणार आहे.ग्राहक या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहतात, अशा रत्नागिरी ग्राहक पेठ प्रदर्शनात आकाश कंदील, पणत्या, रांगोळ्या, उटणे, फराळ, पर्सेस, परफ्युम्स, घरगुती उत्पादने, कोकण मेवा, इन्स्टंट फूड प्रॉडक्टस् विविध ब्रँडेड वस्तू, साड्यांचे विविध प्रकार, सौंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, हॅण्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, ड्रेस मटेरिअल्स, अगरबत्ती, नर्सरी आकर्षक झाडे, विविध खाद्य पदार्थांची रेलचेल आणि बरंच काही आहे.प्रदर्शनाच्या कालावधीत सहभागी स्टॉलधारक महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी महिला उद्योगिनींनी रत्नागिरी ग्राहक पेठच्या संस्थापिका प्राची शिंदे, 9422376224/ 9764417079 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.