
दारूसाठी काय पण ,चक्क अंबुलन्स मधून दारूची वाहतूक करताना तीन जण सिंधुदुर्ग पोलिसांच्या अटकेत
गोव्यात मिळणारी स्वस्त दारूची वाहतूक करण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात त्यामुळे गोवा व सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवर पोलिसांचे नेहमी कडक नजर असते नव्या कोऱ्या ॲम्बुलन्स मधून दारूची वाहतूक करताना तीन जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत ॲम्बुलन्स मधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी गडहिंग्लज येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंबोली चेक पोस्ट येथे करण्यात आली.त्यांच्याकडून नव्या कोऱ्या ॲम्बुलन्ससह १ लाख ८ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. संजय मनोहर कल्याणकर (४०) विनायक शिवाजी पालकर (३८) व भिकाजी शिवाजी तोडकर (४३, सर्व रा. शेंद्री ब्लॉक वाडी ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहे. साई ॲम्बुलन्स सर्व्हिस असे लाल अक्षरात लिहून संबंधित संशयितांनी रुग्णवाहिकेतून दारू वाहतूक केली. यात सुमारे १७ बॉक्स दारू आढळून आले आहे. www.konkantoday.com