
बँक खाते हॅक करून शहात्तर हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घडत असतानाच आता बँकेची कोणतीही माहिती शेअर न करता देखील खातेदाराच्या बँक खात्यातील शहात्तर हजार रु अज्ञाताने काढून घेण्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे घडला आहे याबाबत दिलीप कुमार जन्म सिंग यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
यातील फिर्यादी दिलीपकुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या एक्सेस बँक अकाउंटमधून शहात्तर हजार रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले पैसे कट होण्याआधी फिर्यादीला कोणत्याही अनोळखी कॉल आलेला नाही तसेच त्याच्या बँडची डिटेल्सची माहिती फिर्यादी आणि कोणालाही शेअर केलेली नव्हती तसेच फिर्यादी याना कोणत्याही बँकेचा ओटीपी आलेला नाही असे असतानादेखील त्यांच्या बँक गप्पांमधून शहात्तर हजार रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले त्यामुळे त्यांचा फोन अज्ञात इसमाने हॅक केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे
www.konkantoday.com