
राजापूर तालुक्यातील नाणार भागामध्ये पूर्वी प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भात ६३ तक्रारी दाखल
राजापूर तालुक्यातील नाणार भागामध्ये पूर्वी प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये झालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहार चौकशीसाठी प्रांत कार्यालयासह संबंधित तलाठी सजामध्ये स्थापन केलेल्या तक्रार स्वीकृती कक्षामध्ये अखेर ६३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये प्रकल्पग्रस्त १४ गावांपैकी साखर गावातून सर्वाधिक ३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर काशिगेवाडी, दत्तवाडी, पाळेकरवाडी, सागवे, कारिवणे व पडवे गावातून एकही तक्रार दाखल झालेली नाही.
प्रकल्प विरोधक असलेल्या कोकणशक्ती महासंघ या संघटनेने मुख्यमंत्र्यांना हवाला देवून तक्र्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. ज्यांच्या जमिनीची विक्री झालेली आहे त्यांना जमीनी परत मिळतीलच शिवाय घेतलेले पैसे परत द्यावे लागणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते.
www.konkantoday.com