एमबी रिपोर्ट करण्याची जबाबदारी ग्रा.पं.ची नाही, पालगड ग्रामपंचायतीचा खुलासा
नळपाणी पुरवठा कर्मचार्यांना वेळेत पगार मिळण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून एमबी रिपोर्ट वेळेत सादर करणे गरजेचे असते. ही जबाबदारी ग्रामपंचायतीची नसते. शिवाय पालगड ग्रामपंचायतीने ठेका घेतलेल्या पाणीपुरवठा योजनेवर काम करणार्या कर्मचार्यांचे वेतन वेळेत काढण्यासाठी ग्रामपंचायतीनेही तब्बल चार स्मरणपत्रेही पाठवल्याची माहिती दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायतीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.यात म्हटले आहे की, दापोली तालुक्यातील पालगड प्रादेशिक योजना ही जि.प. मालकीची योजना आहे. ग्रामस्थांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायत पालगड प्रत्येक वर्षाला वाढीव मुदत म्हणून १ वर्षासाठी देखभाल व परिचलन करणे या कामासाठी ग्रा.पं. पोट मक्तेदार म्हणून घेत असते. रोजंदारी कंत्राटी कर्मचारी यांचे पगार काढण्यासंदर्भात मोजमाप वही ही उपअभियंता जि.प. ग्रा. पा.पु. उपविभाग दापोली यांच्यामार्फत केली जाते. ही मोजमाप वही बिलासाठी जि.प. ला सादर करण्यात येणे आवश्यक असते. ही मोजमाप वही वेळेवर सादर होत नसल्याने कर्मचार्यांना वेळेवर पगार मिळत नाहीत. www.konkantoday.com