अंजनवेल ग्रामपंचायतीने कातळवाडीतर्फे सार्वजनिक शौचालय दुरूस्तीच्या कामात अपहार झाल्याचा आरोप
गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीने कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील १५ वा वित्त आयोगातील निधीतून सार्वजनिक शौचालय दुरूस्तीच्या कामामध्ये संगनमताने निधीची लूट करत अपहार केला आहे. त्यांच्यावर शासननिर्णय ४ जानेवारी २०१७ प्रमाणे कारवाई करावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नोंदणी रद्द करावी, अशी मागणी येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांनी केली आहे.माजी सरपंच यशवंत बाईत यांनी अंजनवेल बोरभाटलेवाडी येथे पत्रकार परिषद घेवून याबाबतचे सर्व पुरावे सादर करत आरोप केले आहेत. तर याबाबत कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडेही केली असल्याचे त्यांनी माहिती देताना सांगितले. www.konkantoday.com