
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास नातुनगर (ता. खेड) येथे मर्सिडीज बेंझ गाडी अचानक आग लागून भस्मसात
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटेच्या सुमारास नातुनगर (ता. खेड) येथे एका मर्सिडीज बेंझ गाडीला अचानक लागलेली आग खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून विझवली.या दुर्घटनेत तीन जण बचावले असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे सुमारे दुर्घटना घडली. मर्सिडिज कंपनीची मोटार (एम एच ०२ बी झेड १४००) ही संदेश राजेश चवळे यांच्या मालकीची गाडी नाशिकवरून निघून गुगल मॅपद्वारे महाड-नातुनगर मार्गे गणपतीपुळे येथे जात होती. या गाडीत एकूण तीन प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्परतेने गाडीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला.आग लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले




