संगलट गावातील कयूम नाडकर यांची झालेल्या सुमारे चार लाख रुपये ऐवजाचा चोरीचातपास गतिमान करावा ग्रामस्थांचा पोलीस निरीक्षकाला निवेदन सादर

खेड( विशेष प्रतिनिधी)*खेड तालुक्यातील संगलट गाव च्या मोहल्यामध्ये दिनांक 5 जानेवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024च्या दरम्यान संगलट मोहाला येथील रहिवासी कय्युम मोहम्मद नाडकर52 यांचे घर असून या घरातून अज्ञात चोरट्याने बंद घरातून सुमारे चार लाख रुपयाचे तांबा भांडी व इतर साहित्य चोरी केल्याची घटना घडली सदरची घरफोडी करताना गॅस कटर च्या माध्यमातून ग्रील कापून आत मध्ये प्रवेश करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली गेल्या अनेक दिवसापासून या बाबीचा तपास लागत नसल्याने आणि तपासाची गतिमान चक्र फिरवण्याकरिता संगलट गावचे संपूर्ण ग्रामस्थांनी आज खेड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना निवेदन सादर करून ग्रामस्थांनी या चोरट्याचा कसून तपास लागण्याकरिता निवेदन सादर केले खेड खारीपट्ट्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून ही तिसरी घटना घडली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे यापूर्वी करजी शिरशी आणि आता संगलट गावात ही चोरीची घटना घडली आहे संगलट गावामध्ये ही प्रथमच एवढी मोठी चोरी झाली असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे गावामध्ये अनेक घरे बंद असून सदर यांच्याही देखील घराला धोका निर्माण झाली असल्याची चर्चा जनतेतून सुरू आहे सदरचा चोरट्याचा त्वरित तपास लागावे अशी संगलट गावातील जनतेतून जोरदार मागणी आहे चोरी होऊन अनेक दिवस झाले असताना चोरट्याचा तपास लागत नसल्याने जनतेतून नाराजी परसत आहे तरी याबाबत खेड तालुक्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी लक्ष देऊन संबंधित आरोपीला तौरीत गजाड करण्यात यावे अशी मागणी संगलट गावातील तमाम जनतेतून करण्यात येत आहेखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ग्रामस्थाना सांगितली आमच्या तपास गतिमान आहे लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल असे आश्वासन दिलेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button