महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली सिद्धेश कदम यांची नेमणूक ही बेकायदेशीर-पर्यावरण तज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी
*महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली सिद्धेश कदम यांची नेमणूक ही बेकायदेशीरअसून, निकषांमध्ये बसणारी नाही. राजकीय पुनर्वसन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप पर्यावरण तज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केला आहे.याबाबत डॉ. चौधरी यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत राज्याचे मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचीव, राज्याचे पर्यावरण मंत्रालय यांना नोटीस पाठविली आहे.कामाचा कोणताही अनुभव नसताना केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी अपात्र व्यक्तीची नियुक्ती करणे म्हणजे निसर्ग, पर्यावरण व परिसंस्थेवर हल्ला करण्याचा हा प्रकार आहे, असे या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कदम यांची नियुक्ती कायदेशीर आहे का? याचे 7 दिवसांच्या आतमध्ये स्पष्टीकरण द्यावे, असेही नोटीसेमध्ये नमूद केले आहे.www.konkantoday.com