
रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघामध्ये घरबसल्या मतदानास प्रारंभ
रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघामध्ये तिसर्या टप्प्यात ७ मे रोजी निवडणूक होणार असून बुधवार १ मे पासून वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठीच्या गृहमतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. ६ मेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९३६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ हजार ५८३ मतदारांना आता घरबसल्या मतदान करण्याची संधी मिळणार आहे. गृह मतदानासाठी मंजुरी मिळालेल्या मतदारांच्या घरी शासकीय यंत्रणेकडून फक्त दोन वेळाच भेट दिली जाणार आहे. या भेटीदरम्यान संबधित मतदारांनी मतदानाचा हक्क न बजावल्यास त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावरही संधी मिळणार नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. www.konkantoday.com