
केंद्र सरकारने तंबी दिली म्हणूनच सीरम कंपनीचे सीईओ अदर पूनावाला लंडनला निघून गेले हसन मुश्रीफ यांचा आरोप
केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच सीरम इन्स्टिटय़ूटने महाराष्ट्राला लसच्या दीड कोटी मात्रा उपलब्ध करून दिल्या नाहीत असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने तंबी दिली म्हणूनच सीरम कंपनीचे सीईओ अदर पूनावाला लंडनला निघून गेले असाही आरोप त्यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, “जे पहिल्या फळीत काम करत आहेत त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत. केंद्राने लसींचं नियत्रंण आपल्या हातात घेण्याची गरज आहे. केंद्र सरकार ४५ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करणार आणि १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं राज्यांनी करावं हे काही बरोबर नाही असेही मुश्रीफ म्हणाले
www.konkantoday.com