काजू उत्पादक शेतकऱ्यांबरोबर काजू प्रक्रिया करणारे कारखानदारही अडचणीत
_काजू उत्पादक शेतकऱ्यांबरोबर काजू प्रक्रिया करणारे कारखानदारही अडचणीत असल्याचे सध्या चित्र आहेकाजू उत्पादक शेतकरी आणि कारखानदार २०१६-१७ पासून अडचणीत आले. त्या वेळी कच्चा काजूचा दर प्रतिकिलो १८० रु. तर तयार काजू ९०० ते १ हजार रु. किलोपर्यंत होता. सध्या काजूचा दर ५५० रुपये तर कच्चा काजूचा दर ८० ते १०० रुपये आहे. सरकारने या परिस्थितीवर तोडगा काढवा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊ, अशी माहिती व्यावसायिक प्रकल्प आराध्ये यांनी दिली. शेतकरी व काजू प्रक्रियाधारक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एमआयडीसी ओंकार कॅश्यू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी रवींद्र करंदीकर, प्रकल्प आराध्ये रत्नागिरी, काजू प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष जयवंत विचारे, महाराष्ट्र काजू मॅन्युफॅक्चरिंगचे संदेश दळवी, काजू प्रक्रियाधारक संघाचे खजिनदार मुकेश देसाई, विवेक बारगीर आदी उपस्थित होते.प्रकल्प आराध्ये म्हणाले, काजूची बाजारातील मागणी व पुरवठा यामधील समतोल बिघडला आहे. बाजारामध्ये दरवर्षी भारताच्या स्थानिक बाजारात ३ लाख मेट्रिक टनएवढा काजू संपतो. साडेचार लाख मेट्रिक टन उत्पादन असून, दीड ते पावणेदोन लाख टन तयार काजू बाजारात पडून राहत आहे. २०१६-१७ पर्यंत ६५ टक्के काजू स्थानिक बाजारपेठेत संपत होता आणि ३५ टक्के काजू निर्यात होत होता; परंतू २०२३ मध्ये सात ते आठ टक्के म्हणजे १८ हजार मेट्रिक टन काजून निर्यात झाला. तयार काजूची निर्यात वाढवणे आवश्यक आहे. कोकणात काजू उत्पादन शेतकऱ्यांना कारखानदारांकडून जास्त दर मिळत नाही. शेतकऱ्यांची कारखानदार पिळवणूक करतोय, असे चित्र उभ राहिले; पण तस नाही २०२२-२३ या वर्षांत प्रोसेसिंग ५ लाख टन काजू तयार झाला. १८ हजार टन विकलागेला. १ लाख ६० टन काजू एक्स्पोर्ट झाला नसल्यामुळे भारतात पडून आहे. याचा परिणाम कारखानदारीवर झाला.www.konkantoday.com