मार्गताम्हानेतील आगीत बागायती जळून खाक
चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने सीमेवर पॉवरहाऊस परिसरात गुरूवारी ७ मार्च रोजी रस्त्याच्या बाजूला ३३ के.व्ही. वीजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून लागलेल्या आगीत देवघर येथील बागायती जळून खाक झाली. यामध्ये सुमारे ९५० आंबा, काजू सागाची झाडे होरपळल्याने सुमारे ३ लाखाचे नुकसान झाले. वीज वितरण कंपनीची ठिणगी पडूनच ही आग लागल्याच्या कारणास दुजोरा दिला आहे.मार्गताम्हाने येथील शेतकरी बागायतदार संदीप कृष्णा चव्हाण यांचे पॉवरहाऊसजवळ देवघर हद्दीत मार्गताम्हाने-गोपाळवाडीकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला साडेआठ एकर क्षेत्रात फार्महाऊस आहे. या क्षेत्रात आंबा, काजू, साग, खैर यांची लागवड केली आहे. येथूनच चिपळूणवरून गुहागरकडे ३३ के.व्ही.ची वीजवाहिनी गेली आहे. उच्च दाबाच्या असणार्या या वीजवाहिनीच्या अचानक ठिणग्या पडल्या. यामुळे परिसरात मोठी आग लागली. www.konkantoday.com