
गाळ उपशासाठी निधी देणार -किरण सामंत
राजापूर शहराला भेडसावणार्या पुराच्या समस्येवर मात करण्यासाठी गतवर्षी नाम फाऊंडेशन सहकार्याने राजापूर नगर परिषद व महसूल प्रशासनाने लोकसहभागातून राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा केला असला तरी अद्यापही या नदीपात्रात गाळ शिल्लक असून हा गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सिंधुरत्न समितीचे सदस्य तथा उद्योजक किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी किरण सामंत यांनी गाळ उपशासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी हनिफ मुसा काझी, सौरभ खडपे, अरविंद लांजेकर, महेश शिवलकर यांसह अन्य उपस्थित होते.www.konkantoday.com