विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात जबाबदार ठरल्याचा ठपका ठेवून जेवण पुरवणारा ठेेकेदार आणि कर्मचारी असे मिळून ७ जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगेली नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात जबाबदार ठरल्याचा ठपका ठेवून जेवण पुरवणारा ठेेकेदार आणि कर्मचारी असे मिळून ७ जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी दिली.सांगेली नवोदय विद्यालयातील सुमारे १५५ मुलांना अन्नातून विषबाधा झाली होती. ही घटना गुरूवारी रात्री घडली होती. त्यांना शुक्रवारी सकाळी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यातील ४९ विद्यार्थ्यांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत एकुण २० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा ठपका ठेवून अजय श्रीचंद्रभूषण प्रसाद कुमार ( रा. बिहार ), हेमंत दत्तराम परब ( रा. शिरशिंगे ), समीर रामचंद्र पालव( रा. घावनळे), महेश सोमाकांत कुडतरकर, संतोष बापू काळे, प्रवीण पुंडलिक कुडतरकर, गणू राजाराम म्हाडगूत ( रा. सावरवाड ) आदी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com