श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक मेळावा येत्या शनिवारी १६ मार्च रोजी होणार पत्रकार साहित्यिक अभिजित हेगशेटये ज्येष्ठांशी सुसंवाद साधणार
_रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक स्नेह मेळावा येथे शनिवार दिनांक १६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजता या वेळेत श्रीराम मंदिरात होणार आहे. त्या मेळाव्यात नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार साहित्यिक श्री. अभिजीत हेगशेट्ये हे “ज्येष्ठांच्या आयुष्याची सेकंड इनिंग” या विषयावर ज्येष्ठांशी सुसंवाद साधणार आहेत. तसेच यावेळी मार्च महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कारही केले जाणार आहेत. या स्नेह मेळाव्याचे अध्यक्षस्थान कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये हे भूषविणार असून सूत्रसंचालन सचिव श्री. सुरेंद्र घुडे हे करतील. मेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कट्ट्याचे प्रसिद्धीप्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी केले आहे.www.konkantoday.com