महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ ५०% अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी प्रस्ताव सादर करा

रत्नागिरी, दि. 24 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ५०% अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.*सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या हे महामंडळ राबवीत असलेल्या ५०% अनुदान योजना व बीजभांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याकरिता या महामंडळाच्या योजना अनूसुचित जाती व नवबौद्ध लोकांच्या स्वयंरोजगारासाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तीन प्रतीत अर्ज स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून कर्ज अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय रत्नागिरी कार्यालयात दाखल करावे. त्रयस्थ तसेच मध्यस्तीमार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.५० टक्के अनुदान योजना – प्रकल्प मर्यादा रु.५० हजार पर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या ५०% किंवा जास्तीत जास्त२५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते.बीज भांडवल योजना :- प्रकल्प मर्यादा रु.५० हजार १ ते रु. ५ लाखापर्यत, प्रकल्प मर्यादेच्या २०% बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४% द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान रु. ५००००/- चा समावेश आहे. बँकेचे कर्ज ७५% देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षाचे आत करावी लागते. अर्जदारास ५% सहभाग भरावयाचा आहे. या योजनेंचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे.अर्ज करण्यास आवश्यक पात्रताअर्जदार अनुसुचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे. वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी विभागासाठी रु. ३ लाख एवढे आहे. अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा थकबाकीदार नसावा. जातीचा व उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-यांनी दिलेला असावा. पासपोर्ट आकाराचे फोटो. रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत. कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल. व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतरदाखलेपत्र. उदा. वाहनाकरीता व व्यवसायाकरीता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इ. बँकेचे खाते क्रमांक व पासबुकची झेरॉक्स प्रतप्रशिक्षण योजना :- सदर योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वंयरोजगार करण्याचे दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते. साधारणपणेप्रशिक्षण फी प्रती उमेदवार प्रशिक्षणा च्या स्वरुपावरुन ठरविण्यांत येते. प्रशिक्षणार्थीना दरमहा रु.१ हजार विद्यावेतन देण्यांत येते. तसेच महामंडळामार्फत प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण फी अदा करण्यात येते.अर्ज करण्यास आवश्यक पात्रताअर्जदार अनुसुचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय १८ ते ४५ वर्ष असावे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button