
रत्नागिरीत उद्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन
_हिंदूना अध्यात्मिक बळ देणारी ही भारतीय मंदिर संस्कृती आज धर्मविहीन सेक्युलर शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. हे थांबले पाहिजे. तसेच मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी यांचे संघटन त्यांच्या समस्या सोडविणे, सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या नियंत्रणात देणे, अशा विविध विषयांच्या अनुषंगाने महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १० मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन रत्नागिरीत होणार आहे.यासंदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकार परिषद पार पडली. सरकारीकरण झालेल्या मंदिरातील पैसा हा मंदिराचे व्यवस्थापन, मंदिर संस्कृतीचे जतन आणि संवर्धन, पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि मंदिरातील धर्मकार्य यांच्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगड राज्य संघटक सुनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.मंदिरापासून धर्म वेगळा करता येत नाही. तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूना अध्यात्मिक बळ देणारी ही भारतीय मंदिर संस्कृती आज धर्मविहीन सेक्युलर शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com