चहा-पाण्याचा कार्यक्रम मोडल्याच्या आला राग, तरुणाला घरात शिरून दहा जणांनी केली मारहाण
मुलीच्या चहा-पाण्याचा कार्यक्रम मोडल्याच्या रागातून तालुक्यातील कोंडये रांबाडेवाडी येथील दहाजणांनी गोळवशी खांबडवाडी येथील २२ वर्षीय तरूण व त्याचे आई-वडिल अशा तिघांना घरात घुसून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी दहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मुलीचा चहा-पाण्याचा कार्यक्रम मोडल्याचा राग मनात धरून कोंड्ये रांबाडेवाडी येथील संबंधित मुलीची आई तसेच विनायक पालये, कुणाल रांबाडे, कल्पेश रांबाडे, प्रशांत रांबाडे, पायल रांबाडे व अन्य चार अशा दहाजणांनी गोळवशी खांबडवाडी येथे जावून दिवेश यशवंत बिराडी (२२) तसेच यशवंत कृष्णाजी बिराडी आणि वैशाली यशवंत बिराडी यांना घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचप्रमाणे वैशाली बिराडी यांच्या कानातील सोन्याची साखळी तसेच कुडी पाडून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दिवेश बिराडी याने केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी एकूण दहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com