स्टेमी’ उपचारासाठी ‘हब’ आणि ‘स्पोक’ मॉडेल

STEMI (ST-Elevation Myocardial Infarction) हा हृदयविकाराचा एक गंभीर प्रकार आहे. ज्यामध्ये हृदय स्नायूला रक्तपुरवठा खंडित होतो. या परिस्थितीत त्वरित उपचार आवश्यक असतात. महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून स्टेमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीद्वारे हब आणि स्पोक मॉडेलमुळे हृदय विकाराच्या रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करुन देत आहे.

कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये-

STEMI चे लवकर निदान करणे.* रुग्णांना तातडीने थ्रोम्बोलायसिस (clot-busting medication) आणि*अँजिओप्लास्टीसारखे उपचार उपलब्ध करणे.*हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी करणे.*कार्यक्रमाची अंमलबजावणी:*जिल्हास्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये STEMI उपचार केंद्रे (SPOKE) स्थापन करण्यात आली आहेत.

या केंद्रांमध्ये ECG मशीन, थ्रोम्बोलायसिसची औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत.* गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये (Hubs) संदर्भित केले जाते, जिथे अँजिओप्लास्टीची सोय उपलब्ध आहे.* रुग्णांना जलद आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका सेवा आणि टेलिमेडिसिनचा वापर केला जातो.

हृदयविकाराचा झटका (STEMI) हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असल्याने यावर तातडीने उपचार करणे आवश्यक असते. STEMI हब आणि स्पोक मॉडेलमुळे रुग्णांना लवकरात लवकर आणि प्रभावी उपचार मिळण्यास मदत होते.*हब आणि स्पोक मॉडेल काय आहे?*या मॉडेलमध्ये, मोठे आणि सुसज्ज हॉस्पिटल ‘हब’ म्हणून काम करतात, तर लहान रुग्णालये जसे की ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘स्पोक’ म्हणून काम करतात. जेव्हा एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा त्याला जवळच्या ‘स्पोक’ रुग्णालयात नेले जाते. तिथे त्याचे प्राथमिक उपचार केले जातात आणि ‘हब’ हॉस्पिटलमधील तज्ञांशी संपर्क साधला जातो. ‘हब’ हॉस्पिटलमधील डॉक्टर रुग्णाची माहिती आणि ईसीजी रिपोर्ट पाहून पुढील उपचार ठरवतात. आवश्यक असल्यास, रुग्णाला तातडीने ‘हब’हॉस्पिटलमध्येहलवले जाते, जिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टीसारख्या advanced procedures केल्या जातात.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परकार हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल, BKL वालावलकर हॉस्पिटल व लाईफ केअर चिपळूण या आरोग्य संस्था HUB म्हणून कार्यरत असून येथे महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत हृदय विकारावर उपचार केले जातात. तरी सर्वांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन मोफत ECG काढून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button