
चिपळूण शहरात गळतीचे प्रकार सुरूच नगर परिषदेच्यावतीने दुरूस्तीचे काम घेण्यात आले हाती
चिपळूण शहरातील खेंड येथील स्वर विहार संकुल लगतच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीचे काम नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी हाती घेतले. या कामामुळे परिसरातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते.चिपळूण नगर पालिकेच्या पाणी पुरवठा करणार्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. विशेष म्हणजे ज्या भागातील जलवाहिनी यापूर्वी एक ते दोनवेळा दुरूस्ती करण्यात आली आहे. तिथेच पाईप फुटण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. काही ठिकाणचा पाणी पुरवठाही बंद ठेवावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.www.konkantoday.com