
उदय सामंत प्रतिष्ठानने घातलेली साद आणि त्याला मिळाला प्रतिसाद! 2986 महिलांनी लाभ घेतला
जागतिक महिला दिनानिमित्त *”उदय सामंत प्रतिष्ठान”* तर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या दिवशी ६ ठिकाणी सुरू असलेल्या या आरोग्य तपासणी कॅम्पला *महाशिवरात्री* असून देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .या पूर्वी आयोजित सर्व प्रकारच्या कॅम्पनादेखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. वेळोवेळी या कॅम्पमधून त्यांना मिळालेले योग्य मार्गदर्शन आणि वैद्यकीय सेवा हेच आजच्या उत्तम प्रतिसादामागचं कारण आहे. प्रतिष्ठानच्या आरोग्य सेवेच्या कार्याला नागरिक आता विश्वासाने प्रतिसाद देत आहेत. प्रतिष्ठनच्या प्रत्येक वैद्यकीय उपक्रमातून चांगली आणि योग्य सेवा मिळणार ही खात्री नागरिकांना मिळाली आहे.आजच्या कॅम्पना मिळालेला प्रतिसाद ही त्याचीच पोच पावती आहे. आजच्या या सहा कॅम्पला कोतवडे 628,वाटद 401,फणसोप,506,नवनिर्माण लोवले 358,नवनिर्माण midc 598,पाली 495 अशा प्रकारे एकूण 2986 महिलांनी लाभ घेतला.www.konkantoday.com