
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरात पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीला
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरात पार्किंकमध्ये उभी करून ठेवलेली दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी मंगळवारी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. जयेश सुहास मयेकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांच्या माहितीनुसार जयेश मयेकर यांनी आपल्या मालकीची दुचाकी (एमएच ०८ एके ६६०१) मारूती मंदिर परिसरात उभी करून ठेवली होती. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली, अशी तक्रार जयेश यांनी शहर पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com