कोच्युवेली एलटीटी एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणार्या प्रवासी महिलेचे २३ लाखांचे दागिने चोरट्याने लांबवले
कोकण रेल्वे मार्गावरील कोच्युवेली एलटीटी एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणार्या प्रवासी महिलेचे २३ लाख रुपयांचे दागिने चोरट्याने चोरून नेले. पवित्रा भास्कर शेट्टी असे या महिलेचे नाव आहे. प्रवासादरम्यान झोपेचा फायदा घेत चोरट्याने पर्समधील दागिने लांबविले. अशी तक्रार पवित्रा यांनी शहर पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ मार्च २०२४ रोजी पवित्रा शेट्टी या कोच्युवेली एलटीटी एक्स्प्रेस गाडीने बैंदुर मूकांबिका रोड रेल्वेस्टेशन ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन असा कोच नंबर ७ मधून प्रवास करत होत्या. रात्री ११ च्या सुमारास पवित्रा या आपली शोल्डर पर्स उशाजवळ ठेवून झोपी गेल्या. प्रवासादरम्यान पवित्रा यांना गाढ झोप लागल्याने या गोष्टीचा फायदा चोरट्याने उचलला. २३ लाख रुपये किंमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. www.konkantoday.com